Friday, April 19, 2024

न्यूज़ अलर्ट
1) मल्टी टैलेंटेड स्टार : पंकज रैना .... 2) राहुल गांधी की न्याय यात्रा में शामिल होंगे अखिलेश, खरगे की तरफ से मिले निमंत्रण को स्वीकारा.... 3) 8 फरवरी को मतदान के दिन इंटरनेट सेवा निलंबित कर सकती है पाक सरकार.... 4) तरुण छाबड़ा को नोकिया इंडिया का नया प्रमुख नियुक्त किया गया.... 5) बिल गेट्स को पछाड़ जुकरबर्ग बने दुनिया के चौथे सबसे अमीर इंसान.... 6) नकदी संकट के बीच बायजू ने फुटबॉलर लियोनेल मेस्सी के साथ सस्पेंड की डील.... 7) विवादों में फंसी फाइटर, विंग कमांडर ने भेजा नोटिस....
रथाच्या दोन चाकांसारखे आहेत पत्रकार आणि कॅमेरामन / शैलेंद्र गांगण
Friday, April 19, 2019 - 12:05:37 PM - By शैलेंद्र गांगण

रथाच्या दोन चाकांसारखे आहेत पत्रकार आणि कॅमेरामन  / शैलेंद्र गांगण
शैलेंद्र गांगण

गेले दोन दिवस jet airways बद्दल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांबद्दल प्रसार माध्यमामधून बातम्या येत आहेत आणि त्यांच्याबद्दल सहानभूती मिळवण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या बाबतीत जे झाले ते वाईटच झाले, त्या बाबतीत दुमत असूच शकत नाही. हे का झाले, कसे झाले, त्यापाठी काय कारणे होती इत्यादि. त्याबद्दल तत्सम अर्थतज्ञ किंवा विमानचालन धोरण निर्माते आपले मत देतीलच, पण तमाम प्रसार माध्यम अश्या किंवा तत्सम कर्मचारी किंवा आस्थापनबद्दल जेव्हा बोलत आहेत किंवा असतात तेव्हा आपल्याच एका इंद्रियाबद्दल किंवा अंगाबद्दल त्यांना हेतुपुरस्सर त्यांचा विसर पडलेला असतो. आणि ते अंग म्हणजे video journalist. गेल्या दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या news चॅनेल मधून आर्थिक तोटा झाला म्हणून किंवा नोकर कपाती च्या नावाखाली अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. आणि त्यात सर्वात मोठा आकडा हा video journalist चा किंवा कॅमेरामन चा होता. पण ह्यावर कधीही माध्यमात चर्चा झाली नाही,किंवा कुठेही छापून आले नाही ,शिवाय कुठल्याच पत्रकाराने ह्यावर प्रकाश टाकला नाही. २०१४ साली मोदी जिंकून आल्यानंतर अनेक डावे-उजवे पत्रकारांनी मोदी ह्या विषयावर बाजूने किंवा विरुद्व आपली-आपली मते मांडली. पण त्यांच्या जवळ असणारा त्यांच्या जिवलगाच्या समस्या त्यांना कश्या दिसल्या नाहीत. तमाम जनतेच्या समस्या आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मांडणारे लोक एक तर सोशिक होते त्याहीपेक्षा आपला आवाज कुठे आणि कसा पोहवायचा हे त्यांना माहित नव्हते. ज्यांना माहित होते ते व्यवस्थापनाच्या किंवा bureau chief किंवा चॅनेल हेड च्या वळचणीला जाऊन बसले आणि तमाम eng कॅमेरामन जातीच्या पोटावर पाय दिला. सर्वांच्या बोलण्यात एकच समान प्रश्न होता कि जर
चॅनेल आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले तर सर्व प्रथम कॅमेरामन ह्या पदावर कुऱ्हाड येते. असे का ? कुठल्याही चॅनेलसाठी कॅमेरामन हे खूप महत्वाचे पद असते. देशात
जेव्हा खाजगी चॅनेलचे वारे वाहू लागले तेव्हा नवनवीन वाहिन्या चालू झाल्या. अनेक नवीन तरुण रक्ताला काम करण्यासाठी नवीन दारे उघडली गेली. जेव्हा खाजगी
वाहिन्या चालू झाल्या तेव्हा कॅमेरामन ह्या पदामध्ये काही भेदभाव नव्हता हा फक्त सिरीयल करणारा किंवा हा eng कॅमेरामन. सर्व कॅमेरामन सर्व format मध्ये
शूट करायचे. पण जेव्हा २४ तास news चॅनेल चे प्रक्षेपण चालू झाले तेव्हा खरा प्रॉब्लेम चालू झाला. शिवाय टेकनॉलॉजि सुद्धा upgrade होत होती. सुरवातीला जे
कॅमेरामन आले त्या बहुतांशी लोंकांकडे तत्सम विषयातील पदवी किंवा पदविका होती, आणि कामसुद्धा दर्जेदार चालत होते. पण जसे जसे सर्व चॅनेल २४ तास चालू झाले
तसे त्यांचा दर्जा सुद्धा घसरत चालला. काही चॅनेल ने जे सहायक कॅमेरामन होते त्यांना कॅमेरामन केले, काही चॅनेल ने तर ड्राइवर ह्या घटकाला कॅमेरामन ह्या
पदावर बसविले,काही ठिकाणी office बॉय, तर काहींनी चक्क चहा बनवणाऱ्या मुलाला कॅमेरामन बनविले. त्यात वाईट काही नव्हते, कारण काही ह्यामधील आज कॅमेरामन आहेत ते आज खरोखर एक चांगले तंत्रज्ञ आहेत. पण बाकीच्यांची काय अवस्था आहे ?हे कोणी पहिले आहे का ? ह्या पाठी चॅनेल चा हेतू वर सुद्धा शंका येते,
त्यांना कुठल्याही प्रतिभेला वाव द्यायचा नव्हता तर कमी पगारात ठराविक पद्धतीचे काम करणारी एक मजूर कॅमेरामनची एक मोठी साखळी उभी करायची होती
जेणेकरून एक चांगला तंत्रज्ञ ज्याकडे पदवी आहे, त्यामुळे त्याला जास्त पगार द्यावा लागतो त्याच पगारामध्ये चार मजूर कॅमेरामन ठेवता येतील हाच हेतू
त्यापाठी होता. सुरवातीला जेव्हा news चॅनेल चालू झाले तेव्हा बातमी समजून घेऊन ,त्यात रस घेऊन shoot करणारी एक कॅमेरामनाची पिठी होती. पण ती हळू हळू
पद्धतशीरपणे संपवली गेली. त्यावेळी ज्या कॅमेरामन ने शूट केलेल्या स्टोरी च्या जीवावर जे पत्रकार मोठे झाले त्यांनी कधीच ह्याबद्दल आवाज उठविला नाही. माझ्या
पाहण्यात तर असे उदाहरण आहे कि जी स्टोरी पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्या बातमीबद्दल त्या पत्रकाराला पुरस्कार मिळाला पण त्याने त्याबद्दल
त्या कॅमेरामॅनचे साधे आभार मानायचे सोडा पण आपल्या सत्कार समारंभाच्या भाषणात त्या कॅमेरामनचे नावदेखील घेतले नाही. आज काय अवस्था आहे eng कॅमेरामनची ? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या मजुराला सुद्धा दिवसाला १००० रुपये मिळतात आणि eng कॅमेरामनला किती तर दिवसाला २०००रुपये. एका चॅनेल मध्ये जिथे बऱ्यापैकी जेष्ठ कॅमेरामन हे मराठी आहेत त्या चॅनेलला तर, मला काही लोकांनी सांगितले कि आम्हाला फक्त ५०० रुपये देतात. तेव्हाच्या एका जेष्ठ कॅमेरामन सांगितले होते कि येणार काळ हा न्युज कॅमेरामन साठी खूप कठीण असणार आहे. ज्या कॅमेरामन ला बातमी समजते किंवा ज्या पत्रकाराला कॅमेरा समजतो तोच पुढे तग धरू शकतो. कॅमेरामन ची जी सध्या अवस्था आहे तिला काही अंशी कॅमेरामन सुद्धा जबाबदार आहेत. किती कॅमेरामॅनने आज स्वतःला upgrade केले, आज सुद्धा न्युज चॅनेल च्या हाताच्या बोटावर मोजता येतील असेच काही कॅमेरामन technically sound आहेत. बाकीच्यांनी फक्त press id कार्ड आपल्या हातात आले त्यातच धन्यता मानली. काही दिवसांपूर्वी मला समजले कि एका प्रथितयश news चॅनेल च्या कॅमेरामनला खंडणी मागितली म्हणून अटक सुद्धा होणार होती, पण प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून त्यावर पडदा टाकण्यात आला. काही ठिकाणी तर जिथे आपण काम करतो त्याच चॅनेल चे कॅमेरे चोरून बाहेर विकण्याचे आणि भाड्याने लावण्याचे धंदे चालू केले. आपण आपल्या उद्देश्यातून दूर जात आहे हे हि ह्यांना समजू नये. हि एक खूप मोठी शोकांतिका आहे. आज eng कॅमेरामन संघटित नाही आहे. नाही म्हणायला tvja सारखी संस्था अस्तित्वात आली, पण त्यामुळे कॅमेरामन चे प्रश्न सुटले का ? संघटनेमध्ये बहुसंख्य असूनही अल्पसंख्यासारखी अवस्था आहे. संघटनेवर जे
प्रतिनिधी आहेत त्यांनी कॅमेरामन ह्या पदाला सन्मान देण्यासाठी काय केले ? फक्त स्वतः व्यक्ती स्वरूप मान मिळून फायदा नाही शेवटी मान हा खुर्चीला असतो
व्यक्तीला नाही. प्रत्येक माणूस आज आपला कंपू घेऊन उभा आहे. आणि बाकीचे आंधळ्यासारखे त्यांच्या मागून चालले आहेत. आज जे कॅमेरामन जेष्ठ आणि कनिष्ठ
ह्या सर्वानी एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे कि कॅमेरामनची अवस्था हि खुराड्यात ठेवलेल्या कोंबड्यांसारखी आहे. मरण नक्की आहे. आज तुझी तर उद्या
माझी पाळी आहे. ज्या पत्रकारांनी १५-२० वर्षांपूर्वी आपली कारकीर्द news चॅनेल मधून चालू केली होती ते आज एक एक पायरी चढत वर गेले तसे त्यांच्या बरोबरचे
कॅमेरामन अन्यातवासात गेले. त्या कॅमेरामनसाठी का कोणी सुचविले नाही कि, नाही हे सुद्धा चांगले पत्रकार होऊ शकतात ? जर पदवीचा निकष तिकडे लावला तर कॅमेरामन ह्या पदासाठी पदवीचा निकष लावला पाहिजे ह्यासाठी कोणी अट्टाहास केला नाही. ज्या कॅमेरामन नि स्वतःहून प्रयत्न केले ते वेळोवेळी हाणून पाडण्यात
आले. शेवटी चॅनेल मधले पत्रकार आणि कॅमेरामन म्हणजे रथाच्या दोन चाकांसारखे आहेत. एक जरी खाली बसले तरी रथ पुठे जाऊ शकत नाही. फक्त ठराविक तंत्राचा अनुभव ह्या निकषावर कुणालाही कॅमेरामन बनवायचे ? कॅमेरामन ह्या पदाची अशी हेटाळणी ह्या आधी कधीच कुठे झाली नसेल. जाता जाता एकच सांगावेसे वाटते कि हा मोठा प्रवाह आहे पुढे येणाऱ्या वादळाचा अंदाज घेऊन मार्गक्रमण करा. संघटित व्हा.
नाहीतर जंगलाचा नियम येथेही लागू होतो.